मुंबई: बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. कंगनाला देण्यात आलेला ‘पद्म श्री’ पुरस्कार (Padma Shri) परत घेण्यात यावा अशी काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे. कंगनाने आज तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधुन भारतीय स्वातंत्र्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. “मी शहीदांचा अपमान केल्याचं कोणी सिद्ध करुन दाखवलं, तर मी माझा पुरस्कार परत करेन” असं कंगनाने म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावर्षी “२०१४ मध्ये भारताला खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य मिळालं. १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होतं” असं विधान कंगनाने केलं होतं. या विधानावरुन सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. तिचा पुरस्कार काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.कंगनाने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे, असा तिच्यावर आरोप आहे. नवी दिल्लीत अलीकडेच कंगनाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म श्री पुरस्कार स्वीकारला होता. या पुरस्कारानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने भारतीय स्वातंत्र्यावर बोलताना वादग्रस्त विधानं केली होती.आपला बचाव करताना कंगनाने भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाची माहिती देणाऱ्या पुस्तकातील एक फोटो शेअर केला आहे. “त्याच मुलाखतीत सर्व काही स्पष्टपणे मांडलं होतं. १८५७ ला स्वातंत्र्यासाठी पहिली संघटीत लढाई लढली गेली. सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्या बलिदानाबद्दलही मी बोलले. १८५७ बद्दल मला माहित आहे. पण १९४७ साली कुठली लढाई झाली, त्या बद्दल मला तरी माहित नाही, कोणी मला त्याबद्दल सांगितलं, तर मी माझा पद्य श्री पुरस्कार परत करीन आणि माफी सुद्धा मागेन. कृपया मला मदत करा” असं कंगनाने म्हटलं आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Ahmednagar News Update : नगर शहरातील रस्त्यांसाठी ३३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर
Ahmednagar News Update : नगर : नगर (Ahmednagar News Update) शहराचा अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे विविध...
श्री रथसप्तमी सण माहिती व कथा
श्री रथसप्तमी सण माहिती व कथा
दिनांक ०७-०२-२०२२ रोज सोमवारी माघ शुद्ध रथसप्तमी हा सण आहे या दिवशी श्री...
ToTokyo Olympic | PV Sindhu : भारताची ‘बॅडमिंटनक्वीन’ पी.व्ही सिंधूनं जिंकलं कांस्य पदक
पी.व्ही.सिंधूनं सामन्यात सुरुवातीपासूनच मजबूत पकड निर्माण केली होती. पहिल्या सेटची सुरुवात दमदार करत सिंधूनं ४-० असा दबाव चीनच्या बिंग जिओवर निर्माण केला...






