राज्यातील 113 नगरपंचायातीमध्ये सोमवारी फेर आरक्षण सोडतअहमदनगर मधील शिर्डी, अकोले, पारनेर अन् कर्जतचा नगरपंचायतींचा समावेश मागील आठवड्यात राज्यातील 113 नगरपंचायतीमध्ये आरक्षण व सोडत कार्यक्रम पारपडला होता. मात्र, हा आरक्षण व सोडत कार्यक्रम महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी (सुधारणा) अध्यादेश 2021 च्या नूसार व महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनयम 1965 आणि सर्वाच्च न्यायालयाच्या निवाड्यानूसार सुसंगत झालेला नव्हता. त्यात चुका झालेल्या असल्याने नगरपंचायतींसाठी फेर आरक्षण काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यानूसार सोमवार (दि.15) ला राज्यात 113 ठिकाणी फेरआरक्षण काढण्यात आहेत. यात नगर जिल्ह्यातील नगरमधील शिर्डी, अकोले, पारनेर अन् कर्जतचा येथील नगरपंचायातींचा समावेश आहे.मागील आठवड्यात शुक्रवार (दि.12) रोजी 113 नगरपंचायतींच्या आरक्षण व सोडत कार्यक्रम झालेला होता. यात अधिनियमातील तरतूदीनूसार प्रमाणामधील अपुुर्णांक, जर एक द्वितीयांशापेक्षा कमी असले तर तो दुर्लक्षित केला पाहिजे आणि जर तो एक द्वितीयांशा किंवा त्यापेक्षा अधिक असले त्या अपुर्णांकाची एक म्हणून गणना केली पाहिजे. या तरतुदीचा अवलंब करून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 27 टक्क्या या 4.59 जागा ऐवजी 5 जागा गणण्यात आलेल्या आहेत आणि त्यानूसार सोडती काढण्यात आल्या होत्या. दुसरीकडे सर्वोच्या न्यायालयात रिट याचिका 2019 व इतर संलग्न याचिकांमध्ये 4 मार्च 2021 रोजी निर्णय आणि उक्त निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा सन 2021 प्रसिध्द केला आहे. त्यानूसार महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी (सुधारणा) अध्यादेश 2021 च्या नूसार व महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनयम 1965 नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तींसाठी राखून ठेवलेल्या जागा, नगरपरिषदेतील थेट निवडणूकद्वारे भरावयाच्या जागा 27 टक्क्यांपर्यंत असतील आणि एकूण आरक्षण, नगर परिषदेतील एकूण जागांच्या एकूण संख्यचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, सदर तरतूद विचारात घेता सर्व नगरपंचायतींमध्ये एकून 17 जागांच्या 27 टक्के नूसर हे प्रमाण 4.59 इतक्या जागा येतात. आदेशामध्ये 27 टक्क्यांपर्यंत अशी तरतूद असल्याने 27 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही, म्हणजेच 4.59 ऐवजी नागरिकांच्या मागस प्रवर्गासाठी 4 जागा देता येतील. नेमका हाच प्रकार मागील आठवड्यात झालेल्या सोडतीत झालेला आहे. यामुळे रद्द ठरण्यात आल्या असून त्याऐवजी आज नव्याने आरक्षण सोडती काढण्यात येणार आहेत.या सोडतीसाठी जिल्हाधिकारी यांनी शनिवार (दि.13) रोजी नोटीस काढली असून आज संबंधीत नगरपंचायतीमध्ये आज नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. काढण्यात येणार्या आरक्षणावर दि.15 पासून गुरूवार दि.18 पर्यंत हरकती आणि सुचना घेता येणार आहेत. त्यानंतर शुक्रवार (दि.19) पर्यंत प्राप्त हरकतीवर सुनावणी होणार आहे. शनिवार (दि.20) हरकती व सुचनांच्या अनुषंघाने अभियाय देवून विभागीय आयुक्त यांना अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार (दि.22) रोजी विभागीय आयुक्त त्यास मान्यता देतील आणि मंगळवार (दि.23) रोजी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायत संकेतस्थळावर प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या तसेच आरक्षण प्रसिध्द करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या सोडतीमध्ये सोईचे आरक्षण निघाल्याने अनेक ठिकाणी निवडणुकीतील इच्छुक आनंदतात होते. मात्र, संबंधीत आरक्षण आणि सोडत रद्द झाल्याने अनेकांचा हिडमोड झाला आहे. आता नव्याने काय आरक्षण निघाणार, आपले पूर्वीचे आरक्षण राहणार की बदलणार या विचाराने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. तर अनेक ठिकाणी नव्याने आरक्षण बदलणार असणार त्याचा तेथील राजकीय समिकरणांवर होणार आहे.
Home महाराष्ट्र अहमदनगर राज्यातील 113 नगरपंचायातीमध्ये सोमवारी फेर आरक्षण सोडतअहमदनगर मधील शिर्डी, अकोले, पारनेर अन्...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
“निखालस अज्ञान”: राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याबद्दल मणिपूर आदिवासी संस्था क्षमस्व
इंफाळ: मणिपूरच्या चुराचंदपूर येथे मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान भारतीय ध्वज संहिता, 2002 चे उल्लंघन करून राष्ट्रध्वजाचे चुकीचे...
कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये – शरद पवार
नाशिक : "राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये" कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य...
राष्ट्रीय क्रीडा दिन : राष्ट्रीय गट दिना आव्हाड प्रतिष्ठानकडून पार्थ स्पोर्ट्स लीगचे प्रश्न
पाथर्डी : अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान (Abhay Awad Social Foundation) यांच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) पाथर्डी शहरातील दुसरी...
महात्मा फुलेंचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते -सुशांत म्हस्के
महात्मा फुलेंचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते -सुशांत म्हस्केआरपीआयच्या वतीने महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी अभिवादनअहमदनगर (प्रतिनिधी)- विद्येचे सर्वश्रेष्ठ महत्त्व पटवून देणारे स्त्री...





