अहमदनगर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सुरत हैदराबाद महामार्गाचे कामासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.राहुरी तालुक्यातील १९ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. या गावातील जमीन अधिग्रहणासाठी भूसंपादन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे नियोजन केले आहे.राहुरी तालुक्यातील धानोरे, सोनगाव ,माळेवाडी – डुक्रेवाडी, कानडगा, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर ,कनगर खुर्द, कनगर बुद्रुक, चिंचविहिरे, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, राहुरी बुद्रुक, राहरी खर्द, डिग्रस, सडे,खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, वांबोरी या गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. केंद्र शासनाने राजपत्रात अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध केली आहे. लवकरच जमिनी ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे काम सुरू होणार आहे.राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागायती व जिरायती जमिनी, पक्की व कच्ची घरे, विहिरी, गोठे, छोटी मोठी झाडे जाणार आहेत. काही जमिनींचे निश्चितीकरण व वाद देखील आहेत.एनएचएआयद्वारा मोबदलाही दिला जाणार आहे. मात्र राहुरी तालुक्यातील सर्वांधिक १९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार असल्याने हायवेचे नकाशे, जाणारे क्षेत्र, सर्व्हिस रोड,हरकती याबाबत राहुरी तहसील कार्यालयात विशेष कक्ष तात्काळ स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सुलभ होणार आहे.दरम्यान, भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या आहेत.
Home महाराष्ट्र सुरत-हैदराबाद महामार्गअहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावांतून जाणार सुरत-हैदराबाद महामार्ग
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
बंगालमधील मालदा येथे टीएमसी पंचायत निवडणुकीच्या उमेदवाराला मारहाण, 1 अटक
सूर्यग्नी रॉय यांनी: आगामी पंचायत निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) उमेदवाराची शनिवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात काही अज्ञात...
“इकडे संप सुरूय, तिकडे त्यांचं नाचगाणं!”, देवेंद्र फडणवीसांची धनंजय मुंडेंवर टीका
Beed : परळीमध्ये धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केलीय. हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं काल परळीत ठुमके लगावले. मंत्री...






