मधुमेहाबाबत जागृती, शिक्षणावर भर आवश्यक- आरोग्य मंत्री राजेश टोपे

613

औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) : मधुमेह आजार आणि त्याच्या उपचाराबाबत जागृती, शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. बालकांमध्ये प्रकार एकचा मधुमेह आढळतो. या आजारासंबंधी आवश्यक त्याप्रमाणात सुविधा, निधी देण्याला शासनाचे प्राधान्य असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.शहरातील हनुमान टेकडी परिसरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली उडाण संस्थेच्या वतीने जागतिक मधुमेह दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य डॉ.पारस मंडलेचा, उडाण संस्थेचे संपत सारडा आदींसह संस्थेचे पदाधिकारी, बालक उपस्थित होते.

मंत्री टोपे म्हणाले, मधुमेहाच्या प्रकार एकमध्ये उपचार उपलब्ध आहेत. उडाणसारखी संस्थेच्या कार्याने बालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. शासन, स्वयंसेवी संस्थेकडून मधुमेही रुग्णांना सेवा मिळते. रक्तातील साखरेची तपासणी आरोग्य उपकेंद्रातही नि:शुल्क करण्यात येते. रक्तातील साखर अधिक वाढलेली असल्यास आवश्यक त्याप्रमाणात उपचार, तपासणी सुविधाही शासनाकडून करण्यात येत असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर मंत्री टोपे यांनी हनुमान टेकडी येथे बालकांसोबत ट्रेकिंगचा आनंद घेत मधुमेह दिन साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here