नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 753 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 441 एवढी झाली असून यातील 87 हजार 761 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 27 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, धर्माबाद 1 असे एकुण 4 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 27 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 27 व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 63 हजार 186एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 59 हजार 356एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 441एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 761एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंकरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-27आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
आता निलेश राणेही अडचणीत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल
आता निलेश राणेही अडचणीत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे हे मागील काही दिवसांपासून कायदेशीर...
कर्नाटक निवडणूक: अभिनेता किच्चा सुदीप भाजपला पाठिंबा देत असल्याने, जनता दलाने त्याच्या चित्रपटांवर बंदी...
बेंगळुरू: जनता दल (धर्मनिरपेक्ष) ने आज निवडणूक आयोगाला पत्र लिहून कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपचे चित्रपट, शो आणि...
भाजपला सोडून पंकजा मुंडेंनी ‘ओबीसी नेत्या’ होण्याची संधी सोडू नयेत: इम्तियाज जलील
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या निवडणूकीत भाजपकडून उमेदवारी देताना पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे....
Train accident attempt : रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न
Train accident attempt : श्रीगोंदा: तालुक्यातील बेलवंडी स्टेशन ते विसापूर स्टेशनच्या दरम्यान मोहरवाडी जवळ निजामबाद पॅसेंजर रेल्वेचा अपघात (Train...





