भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्ये…*मुंबई दि. १२ नोव्हेंबर – एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत… दंगा करत आहेत… अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्यसरकारची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात होत असलेली घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाही समाचार जयंत पाटील यांनी घेतला.
Home महाराष्ट्र एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच;सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पहात नाही – जयंत पाटील
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
दुधासह अक्रोडचे सेवन करा; आरोग्यास खूप फायदे होतील!
*दुधासह अक्रोडचे सेवन करा; आरोग्यास खूप फायदे होतील!*
सुकेमेवे आपल्या शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक प्रकाराचे...
केजरीवालांचे ‘भाजपने अपहरण’ केलेले उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले, घटनांना आलेले...
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय खलबते तीव्र झाली आहेत. आम आदमी पार्टीने 15 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय जनता...
आपल्या फोनवरआधार कार्डडाउनलोड करा |DownloadAadhar Cardआधार कार्ड
Aadhar card information in marathi आजच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) हे...
मान्सून मुंबईत दाखल! IMD ने यलो अलर्ट जारी केला – फोटो पहा
भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील 4-5 दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार...