मुंबई दि. १२ नोव्हेंबर – कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्या अभिनेत्री कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.
Home मनोरंजन कलाकार / नाटक / सिनेमा कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
भारत अंदमान निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचे नाव देणार आहे
बंगालच्या उपसागरातील भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटसमूहांमधील एकवीस अज्ञात बेटांना परमवीर चक्राने सुशोभित केलेल्या भारतीय सशस्त्र दलाच्या...
विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल, असे सीएम रेड्डी म्हणाले
येत्या काही दिवसांत विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशची नवीन राजधानी म्हणून घोषित केले जाईल, असे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन...
‘लाल डायरी’वरून अमित शहांनी अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर “लाल डायरी” वादावर निशाणा साधला, ज्यात...
Nagpur Covid : विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोना चाचणी, मनपाचा...
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक असून कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची...




