महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून नियोजित असलेली दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2020-21 ही ऐनवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करावी लागली होती. गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. दरम्यान, राज्य मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे लागणार आहे.यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील 12 नोव्हेंबर सकाळी 11 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ? http://feerefund.mh-ssc.ac.in या लिंकवर भरायचा आहे बारावीच्या विद्यार्थ्यांनी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून / लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षा ही जरी त्यावेळी रद्द झाली होती. तरी या परीक्षेचे तयारीचे काम पूर्ण झाले होते. सोबतच प्रश्नपत्रिका सुद्धा छापून तयार होत्या. त्यामुळे मंडळाला यासाठी जमा झालेल्या परीक्षा शुल्कातून खर्च करावा लागला होता. त्यामुळे हा खर्च विचारात घेऊन अंशतः परीक्षा शुल्काचा परतावा हा विद्यार्थ्यांना दिला जाईल. मागील सहा महिन्यांपासून जमा असलेले परीक्षा शुल्काचे कोट्यावधी रुपये शिक्षण विभागाने तातडीने परत करावे अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर आता हे परीक्षा शुल्क परत केले जात आहेत.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
माजी नगरसेवक शेख मुदस्सर यांच्या नेतृत्वाखाली मंगल गेट परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहमदनगर - राज चेंबर ते मंगल गेट परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे या मागणीसाठी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद यांच्या नेतृत्वाखाली...
कोव्हिड सेंटरमधून महिलाच गायब ! आईने केले उपोषण सुरू…
कोव्हिड सेंटरमधून महिलाच गायब ! आईने केले उपोषण सुरू…
पुणे :- पुण्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असतानाच प्रशासनाचा भोंगळ...
SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट
नगर : राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची (SSC Exam) परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार...
अखंडतेच्या लढाईत अमेरिका भारतासोबत; परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांचा चीनला इशारा.
अखंडतेच्या लढाईत अमेरिका भारतासोबत; परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांचा चीनला इशारा.
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिके दरम्यान राजधानी...