दि. 9 (जिमाका): कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्यावतीने शनिवार दि. 11 डिसेंबर 2021 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा व्ही.व्ही.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि शाळा न्यायाधिकरण येथे आभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले आहे . जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर तसेच सर्व तालुका न्यायालय कळे, खेरीवडे, मलकापूर , पन्हाळा , कागल , कुरुंदवाड, इचलकरंजी, आजरा, चंदगड, गडहिंगलज, जयसिंगपूर, पेठवडगाव, राधानगरी येथे आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबीत वाद तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ,१३८ एन. आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटर वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅंकेशी संबधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश यामध्ये असणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार असून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या न्याय निवाड्याचे तडजोडीने समाधान दोन्ही पक्षकारांना होत असते . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व पक्षकार,अधिवक्ता आणि न्यायालयातील कर्मचारी व पॅनल सदस्य यांच्या सुरक्षितेच्या दुष्टीकोनातून व्हॉटसॲप व आभासी तंत्रज्ञानाव्दारे संबंधीत पक्षकारांची ओळख आधीच निश्चित करून लोकन्यायालयाच्या दिवशी तडजोडीमधील अटी व शर्ती नोंदविता येण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले आहे . अधिक माहिती करीता ०२३१-२५४१२९५ या क्रमांकावर संपर्क साधाव.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
महात्मा गांधी-सुभाषचंद्र बोस मतभेद परस्पर स्वाभिमानावर आधारित होते
१९३९ पासून मानवजातीने आजवर पाहिलेल्या अत्यंत भीषण आणि क्रूर युद्धाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीतील बर्लिन येथे...
प्रेमाच्या त्रिकोणातून दोन तरुणींसह एका तरुणाची आत्महत्या?
प्रेमाच्या त्रिकोणातून दोन तरुणींसह एका तरुणाची आत्महत्या!
सांगली - तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांचे...
राजस्थानचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुडा यांनी सर्व राज्यमंत्र्यांच्या नार्को चाचणीचा सल्ला दिला आहे
जयपूर: मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतरांच्या आर्थिक अनियमिततेचा तपशील असल्याचा आरोप करत त्यांनी विधानसभेत 'लाल डायरी' फिरवल्यानंतर,...
अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश !
अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश !
अहमदनगर :- शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन अनधिकृत खासगी कोविड...





