विकी कौशल-कतरिनाच्या ‘संसारा’ची तयारी सुरु; तब्बल ‘एवढे’ लाख रुपये भाडे देऊन घेतले घर

653

Vicky Kaushal House : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या नात्यावर गेले काही दिवस अनेक चर्चा होताना दिसून येत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. राजस्थानमधील सेन्स फोर्ट बरवारा येथे शाही पद्धतीने लग्नसोहळा पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच विकी कौशलने जुहू येथे भाड्याने घर घेतलं असून त्याचे भाडे दरमहा आठ लाख रुपये असल्याचं समजतंय.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे शेजारी कतरिना आणि विकी असतील असा अंदाजदेखील वर्तवला जात आहे. विकीने जुहूमधील राजमहल इमारतीत 60 महिन्यांसाठी म्हणजेच पाच वर्षांसाठी एक आलिशान घर भाड्याने घेतले आहे. या घरासाठी सुरुवातीच्या 36 महिन्यांचे भाडे आठ लाख रुपये प्रति महिना आहे. त्यापुढील 12 महिन्यांसाठी दरमहा 8.40 लाख रुपये भाडं आहे. तर उर्वरित 12 महिन्यांसाठी विकी कौशल दरमहा 8.82 लाख रुपये भाडे भरणार आहे. 

कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. हा सिनेमा लवकरच 100 कोटींची कमाई करणार आहे. कतरिना सोबत सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंगदेखील दिसून आले आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच लोकप्रिय झाला होता. तर विकी नुकताच ‘सरदार उधम’ सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘सरदार उधम’ सिनेमातील विकीच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. 

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अडकणार विवाहबंधनात
मीडिया रिपोर्टसनुसार, विक्की कौशल आणि कतरिना कैफने लग्नासाठी डिसेंबरचा महिना निवडला आहे. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. हा लग्नसोहळा साधासुधा नसून अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार आहे. हा विवाह सोहळा 700 वर्ष जुन्या असलेल्या राजस्थानमधील एका किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधवपूर येथील एक रिसॉर्ट बूक करण्यात आला आहे. या लग्नात कोण उपस्थित असणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here