“डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलोय”

465

मुंबई | एनसीबीनं 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत एका क्रुझवर कारवाई करत ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केला होती. तेव्हापासून राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात कलगीतूरा रंगलेला आहे.

एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचं मलिक म्हणाले होते. परिणामी राज्यात खळबळ माजली होती. आता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांनी 1993 बाॅम्ब हल्ला प्रकरणातील आरोपींकडून जमीन घेतल्याचा आरोप मलिक यांच्यावर फडणवीस यांनी केला होता. हे सर्व आरोप मलिक यांनी फेटाळून लावले आहेत.

आता मलिक यांनी परत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत गृहमंत्री असताना गुंडांना अभय दिल्याचं म्हटलं आहे. परिणामी फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर देताना ट्विट केल आहे.

डुकराशी कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे, अशा आशयाचं एक ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांचा निशाणा नेमका कुणाला आहे याची चर्चा राज्यात आहे.

डुकराशी खेळल्यानं तुम्हीही चिखलानं माखले जाता आणि डुकरालाही तेच हवं असतं, असं ट्विट करत फडणवीस म्हणाले आहेत. परिणामी नवाब मलिक आणि फडणवीस यांच्यातील वाद वाढण्याची चिन्ह आहेत.

राज्याच्या राजकारणात फडणवीस यांना जोरदार प्रत्यूत्तर देणारा नेता म्हणून ओळखलं जात पण मलिक यांच्या आरोपांना फडणवीस यांनी केवळ सुविचाराच्या माध्यमातून उत्तर दिल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज प्रकरणावरून जोरदार खडाजंगी होत आहे. फडणवीस यांनी मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

मलिक यांनी फडणवीस यांच्यावर गुंडांना वाचवल्याचा आरोप केला होता. या दोन्ही नेत्यांनी सध्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका करायला सुरूवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here