Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर शासकीय रुग्णालयात अग्नितांडव, ICU ला आग 6 जणांचा मृत्यू, सूत्रांची माहिती

1518

अहमदनगर: राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तण्यात आलीय. तर, काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

पाच जणांचा मृत्यू आणखी काही जण भाजल्याची शक्यता

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. रुग्णालयाच्या तळमजल्यावर आग लागली.

आग कशामुळं लागली याचं कारण अस्पष्ट

जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.यानिमित्त शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा निर्माण झालाय.

 20 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं

जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. आयसीआयूला लागलेल्या आगीत 12 ते 15 जण जखमी झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांनी दिली आहे.

अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीनं कोल्हापूरहून नगरकडे निघणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here