आकाश शिंदे याच्यासह ५ जणांवर मोक्कातंर्गत कारवाई

आकाश शिंदे याच्यासह ५ जणांवर मोक्कातंर्गत कारवाई अहमदनगर- जिल्हयात संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार आकाश पांडुरंग शिंदे (वय २६, रा-पाण्याचे टाकीजवळ, विळद ता. जि. अहमदनगर ) व त्याच्या टोळीतील ५ सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे.आकाश पांडुरंग शिंदे (वय २६, रा-पाण्याचे टाकीजवळ, विळद ता. जि. अहमदनगर ) व त्याच्या टोळीतील स्वप्निल ऊर्फ आदित्य अशोक पाखरे (वय २५, रा.नागरदेवळे ता जि अ.नगर), किशोर ऊर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय २४, रा-देहरे ता जि अहमदनगर), महेश मनाजी ऊर्फ मनोहर शिंदे (वय २८, रा-विळद ता जि अहमदनगर), गणेश रमेश शिंदे (वय ३०, रा-विळद ता जि. अहमदनगर), सागर संजय शिंदे (वय २७, रा-विळद ता जि. अहमदनगर) आदिंवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत, त्याच्याविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या नुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. २९० / २०२१ भा.दं.वि. क. ३९५,३९७,३४,१२०(ब) शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दि. १० मे २०२१ रोजी घडला होता. तो गुन्हा आकाश पांडुरंग शिंदे व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्याकरीता प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी (मोक्का) प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडे पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावास दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमाप्रमाणे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळाली. त्यानुसार आरोपी शिंदे याच्यासह टोळी सदस्यावर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here