महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी खास योजना, मोदी सरकारचा मोठा उपक्रम..!

_*महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी खास योजना, मोदी सरकारचा मोठा उपक्रम..!*_ महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदी सरकारने विशेष पुढाकार घेतला आहे. स्वयं-सहायता बचत गटातील महिलांना मानाने जगता यावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या महिलांना दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळावे, यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय मदत करणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 70 लाख बचतगटांमध्ये 7.7 कोटी महिलांचा समावेश आहे. बचतगटांना वार्षिक 80,000 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भांडवली सहाय्य केले जाते. मंत्रालय पुढील दोन वर्षांत बचतगटांच्या 2.5 कोटी ग्रामीण महिलांना उपजीविकेसाठी आधार देणार आहे.महिलांना दरवर्षी एक लाख रुपये उत्पन्न मिळावे, यासाठी घरगुती स्तरावरील उपजीविकेच्या साधनांमध्ये विविधता आणली जाणार आहे. बचतगटांच्या विविध मॉडेल्सच्या आधारे राज्य सरकारांना सल्लागार जारी करण्यात आले आहेत. *कसे वाढविणार उत्पन्न..?*महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यशाळा झाली. त्यात राज्य सरकारे, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, ट्रान्सफॉर्मेशन रुरल इंडिया फाउंडेशनचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.कृषी व संलग्न साधनांतून पशुधन, वन उत्पादने आणि घरगुती जीवनात विविधता आणण्यावर भर देण्यात आला. त्यातून महिलांना एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकेल. क्लस्टर स्तरावर बचतगट, ग्रामसंस्थांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here