_*शिळे अन्न पुन्हा गरम करुन खाणे टाळा, शरीरासाठी ठरु शकते अपायकारक..!*_ बऱ्याचदा जेवणानंतर अन्न शिल्लक राहते. खाद्यपदार्थ वाया जाऊ नये, म्हणून महिला ते फ्रिजमध्ये ठेवतात व नंतर तेच पुन्हा गरम करून खातात. मात्र, असे शिळे अन्न खाणे, जिवावरही बेतू शकते. कारण असे शिळे अन्न पुन्हा गरम केल्याने त्याचे रुपांतर विषात होऊ शकते.शिळे अन्न वारंवार गरम केल्याने त्याच्यातील पोषकतत्वेही नाहीसे होतात. कोणते खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाणे टाळले पाहिजे, याबाबत जाणून घेऊ या…*पालक भाजी*शिळी राहिलेली, फ्रिजमध्ये ठेवलेली पालक भाजी पुन्हा गरम करून खाणे टाळायला हवे. कारण, त्यातून कॅन्सरचा धोका वाढू शकतो. पुन्हा शिजवल्याने पालकमधील नायट्रेट तत्व हानीकारक होतात. *भात*बऱ्याचदा शिळा भात परत गरम खाण्यात येतो. मात्र, त्यामुळे फूड पॉयजनिंग होण्याची शक्यता असते. *बीट*शिळी बीटची भाजी पुन्हा गरम केल्यास त्यातील नायट्रेट नष्ट होते. त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात. अशी भाजी शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. *मशरूम*मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. ते पुन्हा गरम केल्याने त्यांची संरचना बदलते, जे शरीरासाठी हानिकारक ठरु शकतात. *तेल*एकच तेल वारंवार गरम करून पदार्थ तळणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान हृदयाचे होते. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू शकते. *बटाटा*बटाट्याची शिळी भाजी वारंवार गरम केल्याने त्यातील बॅक्टेरियामुळे बोटूलिज्म विष तयार होते. ते शरीरातील नर्व्हजवर अटॅक करते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, मांसपेशीमध्ये पॅरालिसीस किंवा थेट मृत्यूही होऊ शकतो.
- English News
- Conference call
- Cyber crime
- देश-विदेश
- Delhi
- Donate
- Education
- Gas / Electricty
- health
- Lawyer
- Loans
- महाराष्ट्र
- अकोला
- अहमदनगर
- आळंदी
- उंब्रज
- कर्नाटक
- कलकत्ता
- पाककृती
- पाथर्डी
- मनोरंजन










