न्युझीलंडविरुद्धही दारुण पराभव, सेमी फायनलसाठी आता असे असेल गणित..भारतीय संघासाठी सेमी फायनल गाठणे अवघड झाले आहे. पाकिस्तान संघाने सगळे सामने जिंकल्याने ते टाॅपवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान संघ आहे. आता भारताने सगळे सामने जिंकले, तरी अन्य संघाच्या निकालावर लक्ष ठेवावे लागणार आहे. न्यूझीलंड गोलंदाजीच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाची तगडी बॅटिंग ढेपाळली. नंतर बाॅलिंगमध्येही भारतीय संघाला विशेष कामगिरी करता आला नाही. न्युझीलंड विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय संघाची वाटचाल अवघड झालीय.कर्णधार केन विल्यमसनने भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने दोन बदल केले. सूर्यकुमार यादव व भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी इशान किशन व शार्दूल ठाकूर यांचा संघात समावेश केला होता. न्यूझीलंडने टीम सैफर्टऐवजी अॅडम मिल्नेला संधी दिली. भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माऐवजी इशान किशनला सलामीला पाठविण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, इशानला (४) फार काही करता आले नाही. त्यानंतर के. एल. राहुलही (१८) बाद झाला.तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या रोहित शर्माला पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नने जीवदान दिले होते. मात्र, त्यानंतरही रोहित मोठी खेळी करू शकला नाही. ईश सोधीने त्याला 14 धावांवर बाद केले. ईश सोधीला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली (९) फसला. अॅडम मिल्नने ऋषभ पंतला (१२) त्रिफळाचीत केले. हार्दिक पांड्याला (२३) मोठे फटके मारता येत नव्हते. रवींद्र जडेजाने 19 चेंडूत 26 धावांची खेळी केल्याने भारतीय संघाने किमान शंभरी तरी ओलांडली.भारतीय संघाने दिलेल्या 110 धावांचा पाठलाग न्युझीलंड संघाने आरामात केला. त्यात जसप्रित बुमराह (२ विकेट) वगळता कोणालाच विकेट मिळाली नाही. न्यूझीलंड अपराजितच..2019 मध्ये झालेल्या वन-डे विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला उपांत्य फेरीत नमवलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम मुकाबल्यातही न्यूझीलंडने भारताला हरवलं. टी-20 विश्वचषकात ३ सामने आता न्यूझीलंडने जिंकले आहेत.सेमी फायनल गाठणे अवघड..न्युझीलंडविरुद्ध पराभव झाल्याने भारतीय संघासाठी सेमी फायनल गाठणे अवघड झाले आहे. पाकिस्तान संघाने सगळे सामने जिंकल्याने ते टाॅपवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान संघ आहे. आता भारताने सगळे सामने जिंकले, तरी अन्य संघाच्या निकालावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
Home English News Conference call न्युझीलंडविरुद्धही दारुण पराभव, सेमी फायनलसाठी आता असे असेल गणित..
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
माजी मंत्री हत्या: सर्वोच्च न्यायालयाने आरोपी खासदारावरील तेलंगणा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशचे माजी मंत्री वायएस विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयला वायएसआर काँग्रेस पक्षाचे...
एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक विधवांनी अर्ज सादर करावेत
अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :- इयत्ता 10 वी व 12 वी बोडांच्या परिक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या रायगड जिल्ह्यामधून प्रत्येकी...
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 3 जवानांच्या विधवांनी जीवन संपवण्याची परवानगी मागितली
जयपूर: 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या तीन सीआरपीएफ जवानांच्या विधवांनी राजस्थान सरकारने त्यांना दिलेली आश्वासने...
चांगल्यासाठी मदत केली जाईल चुकीचे वागला तर कडक कारवाई करणार – पोलीस निरीक्षक चंद्रशेखर...
अहमदनगर दि :- ८/४/२०२३, कोतवाली पोलीस स्टेशन, संजयनगर पुनर्वसन प्रकल्प व बालभवन यांच्या संयुक्त विद्यमानाने संजयनगर सेवावस्तीमध्ये...




