कॅम्प पो.स्टे. भिंगार हद्दितील सर्व नागरिकांना आवाहन जागरूक राहा,सुरक्षित राहा
★ दिवाळी सणानिमित्त
बाजारात खरेदीसाठी
जाताना अंगावरील सोने
मौल्यवान वस्तु झाकुन ठेवावे .सोनसाखळी चोरांपासुन सावध रहावे.
★ATM व बँकेतुन पैसे काढल्यानंतर पैसे सुरक्षित ठेवावे.पैसे कोणी हिसकावुन अथवा बहाना करुन नेणार नाही याची दक्षता घ्यावी.
★ आपले वाहन सुरक्षीत ठिकाणी पार्क करावे .ज्या ठिकाणी पार्किग सुविधा व सी.सी.टि.व्ही.कँमेरे ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी मोटार सायकल पार्क करावी.
★आपले वाहनात मौल्यवान वस्तु ठेवु नये.जेणेकरुन बँग लिप्टिंग अथवा चोरी होणार नाही.
★ ज्यांना शक्य आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत ..
★ गावातील पोलिस पाटील, सरपंच , उपसरपंच व तरुण मुलांनी एक व्हॉट्स ग्रुप बनवावा …त्यामुळे लहान मोठया काही घटना घडल्यास तात्काळ माहिती मिळेल ..
★ सरपंचांनी पुढाकार घेऊन ग्राम रक्षक दल स्थापन करून त्यांचा पोलिसांबरोबर पाठपुरावा करावा…तसेच त्यांना शिट्या व इतर साहित्य पुरवावे .
★ नागरिकांनी सणानिमित्त बाहेरगावी जाताना शेजारच्या नागरिकांना माहिती देऊन जावे व एकमेकांचे फोन नंबर्स माहिती असावे …
★ घरात जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये तसेच अंगावर दागिने घालू नयेत ते बँकेत सुरक्षीत लाँकरमध्ये ठेवावेत.
★ दिवसा अनोळखी व्यक्ती गावात किंवा शेत वस्तीवर रेकी करताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी …
★ आपण केलेला मोठा आर्थिक व्यवहार ईतरांना माहित होणार नाही याची काळजी घ्यावी…
★कोणताही आर्थिक व्यवहार किंवा ईतर खरेदी -विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करावे ..
★सर्वांनी सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची व त्या पेक्षाही मौल्यवान म्हणजे आपल्या जीवाची सुरक्षा करावी…
★महिलांनी बाजार,गर्दीच्या ठिकाणी ,लग्न व ईतर कार्यक्रमाला जाताना कमीत- कमी दागिने घालून जावे.. कारण या ठिकाणी चोरट्यांची नजर दागिन्यावर पडल्यास ते घरापर्यन्त रेकी करीत येवू शकतात.
★ बतावणी-पुढे पोलिस आहेत तपासणी चालु आहे,पुढे खुन झाला आहे.तुमच्या अंगावरील सोने काढुन द्या अशी बतावणी करुन फसवणुक केली जाते.अशा व्यक्तीपासुन सावध रहावे. आपल्याकडिल वस्तु कोणालाही काढुन देऊ नये.एकटे फिरु नये. संतर्क रहावे.
★कोणतीही घटना अथवा माहिती मिळाल्यास खालील फोन.नंबरवर संपर्क करावा.
कॅम्प पो.स्टे. भिंगार
0241/2416121
सहा.पो.निरीक्षक श्री. शिशिरकुमार देशमुख
मो.नं.9890741692
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा????
*( शिशिरकुमार देशमुख)*
सहाय्यक पोलीस निरीक्षक
कॅम्प पोलिस स्टेशन भिंगार









