गावसकरांचा सल्ला*_*’न्युझीलंडविरुद्ध जिंकायचे असेल, तर यांना बाहेर करा..! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केला. त्यामुळे ‘टीम इंडिया’ची वाटचाल कठीण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) भारताचा सामना न्युझीलंडसोबत होणार आहे. पाकिस्तान संघाने न्युझीलंड संघाचाही पराभव केल्याने त्यांच्यासाठीही हा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळेही तेही जिवाची बाजी लावून खेळणार, हे नक्की. विशेष म्हणजे, आपण टी-20 वर्ल्ड कपमध्ये कधीही न्युझीलंडविरोधात जिंकलेलो नाहीत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी माजी कप्तान सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, की “न्युझीलंडला हरविण्यासाठी ‘प्लेईंग इलेव्हन’मध्ये दोन बदल करावे लागणार आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूर, तसेच इशान किशनचा संघात समावेश करावा.” *इशान जबरदस्त फॉर्ममध्ये*ते म्हणाले, की “खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गोलंदाजी करीत नसल्यास मॅच फिनशर म्हणून इशान किशनला संघात घ्यावे. सध्या इशान जबरदस्त फॉर्ममध्ये असून, सराव सामन्यात तो चमकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी द्यायला हवी.” भुवनेश्वर कुमार सध्या फॉर्मात दिसत नाही. अशा परिस्थितीत शार्दुलचा टीम इंडियात समावेश करणे आवश्यक आहे. ‘आयपीएल’मध्ये त्याने 21 विकेट घेतल्या होत्या. तसेच हार्दिक पांड्या पाकिस्तानविरुध्द 11 धावा करु शकला. त्यामुळे त्याच्या जागी इशानचा समावेश करावा, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
हिमाचलमध्ये पावसाचा प्रकोप, 71 जणांचा मृत्यू: शिमल्यात शाळा बंद, ‘पर्वतासारखे आव्हान’, मुख्यमंत्री म्हणतात |...
हिमाचल प्रदेशात भूस्खलनाला कारणीभूत असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत ७१ लोकांचा मृत्यू झाला असून या वर्षीच्या...
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे धारण केले विध्वंसक रूप
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे धारण केले विध्वंसक रूप
भारताची राजधानी दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचे विध्वंसक रूप बघायला मिळत आहे.दिल्लीमध्ये नवीन रुग्णांची...
नेरुळ प्लॉटला ₹6.72 लाख प्रति चौरस मीटरची विक्रमी बोली लागली
नवी मुंबईतील रिअल इस्टेट उद्योगाला धक्का देणार्या अभूतपूर्व बोलीमध्ये, पाम बीच रोडजवळील नेरुळमधील सिडकोच्या भूखंडाला प्रति चौरस...





