भिवंडी येथे पहाटे 3:40 च्या सुमारास धामणकर नाका जवळ, पटेल कंपाऊंड, नारपोली, भिवंडी येथे (तळ+तीन मजली) इमारतीचा भाग कोसळला आहे. याठिकाणी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून घटनास्थळी भिवंडी अग्निशमन केंद्राचे 3 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेत ढिगाऱ्याखाली 35 रहिवासी अडकल्याची शक्यता असल्याने बचाव कार्यात मदत करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट विभागाचे (15 जवान, 1 ड्रायव्हर, 1 टेम्पो, 1पिकअप) आज पहाटे 04:37 वाजता रवाना झाले. डिझास्टर मॅनेजमेंटची एक तुकडी 04:50 अंधेरी येथून रवाना झाली होती.
आतापर्यंत 10 मृतदेह ढिगार्याखालून तर 11 जणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. अद्याप मदतकार्य सुरू आहे.
भिवंडी अपडेट:-
आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
1) हेदर सलमानी ( पु/20वर्ष)
2) रुकसार खुरेशी (स्त्री/26 वर्ष)
3) मोहम्मद अली (पु/60वर्ष)
4) शबीर खुरेशी (पु/30 वर्ष)
5) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/45 वर्ष)
6) कैसर सिराज शेख (स्त्री/27 वर्ष)
7) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ 25 वर्ष)
8) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/18 वर्ष)
9) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/ 22 वर्ष)
10) जुलेखा अली शेख (स्त्री/52 वर्ष)
11) उमेद जुबेर कुरेशी (पु/ 4 वर्ष)
मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
1) झुबेर खुरेशी (पु/30 वर्ष)
2) फायजा खुरेशी (पु/ 5 वर्ष)
3) आयशा खुरेशी (स्री/7 वर्ष)
4) बब्बू (पु/ 27 वर्ष)
5) फातमा जुबेर बबु (स्त्री/ 2 वर्ष)
6) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/ 8 वर्ष)
7) उजेब जुबेर (पु/ 6 वर्ष)
8) असका आबिद अन्सारी (पु/ 14 वर्ष)
9) अन्सारी दानिश अलिद (पु/ 12 वर्ष)
10) सिराज अहमद शेख (पु/ 28 वर्ष)











