शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन…!कॉर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन, मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा…!मुंबई- बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुज पार्टी मध्ये आमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून अटक होती. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला नव्हता. त्यामुळे आर्यनच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यावर सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज आणि मूनमून धमेचा अशा तिघांना अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. एक प्रकारे हा शाहरुख खानच्या परिवाराला मोठा दिलासा असून गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेल्या आर्यनची आता सुटका होणार आहे. आज जामीनाची पूर्तता केल्यानंतर आज किंवा उद्या त्याची ऑर्थर रोड कारागृहातून जामिनावर मुक्तता होईल. आज उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केलेला असताना काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एनसीबी कडून आर्यन खान आणि त्याच्या दोन मित्रांच्या जामिनावर मोठा विरोध करण्यात आला. आर्यन खान हा नियमित अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचं एनसीबीचे म्हणणं होतं. हा गुन्हा केवळ अमली पदार्थ सेवनाचा नसून अमली पदार्थ बाळगणे याबद्दलचा आहे असा युक्तिवाद करतानाच अरबाज त्याच्याकडे अमली पदार्थ सापडल्याचा दावा केलेला होता. आर्यन खान हा सुद्धा या कटातील महत्त्वाचा भाग आहे असे एनसीबी चे म्हणणे होतं. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केलेला आहे . शाहरुख खान आणि त्याच्या परिवारासाठी हा मोठा दिलासा असल्याचं माणण्यात येत आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार ?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केलं असून या नवीन आयकर विधेयकात काही बदल...
मुंबईत आज तब्बल ६ हजार ३४७ नवे कोरोना रुग्ण; संकट दिवसागणिक गंभीर
मुंबईत कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ६ हजार ३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे....
संतोष देशमुख हत्याप्रकरण: वकिलाच्या दाव्यानंतर आका कोण हे समोर आले, सुरेश धस यांनी स्पष्ट...
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अपहरण प्रकरण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमुळे...
एस जयशंकर यांच्या ब्लिंकन यांच्या भेटीत, अमेरिकेने भारत-कॅनडा पंक्तीचा उल्लेख केला नाही
नवी दिल्ली: परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये त्यांचे यूएस समकक्ष अँटोनी ब्लिंकन यांची भेट...





