_औरंगाबाद जिल्ह्यातील घडामोडी!
➡️ एसटी कर्मचाऱ्याची पत्नी पुष्पा येलवांडे यांची ॲड. सुविध कुलकर्णी व ॲड. प्रतिक्षा काळे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या संदर्भात याचिका दाखल.
➡️ सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने नियमन कायद्याची (कोटपा) शाळा परिसराच्या शंभर मीटर परिसरात कठोर अंमलबजावणी करा- पोलिस उपायुक्त अपर्णा गिते.
➡️ शासकीय कार्यालयात येताना कोविड लसीकरणाचा पहिला डोस आवश्यक; जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक यांची माहिती.
➡️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांसाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान 9 दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जाणार.
➡️ खामगाव येथे फायनान्स कंपनीचे पैसे बुडवण्यासाठी ट्रकची परस्पर विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.
➡️ वृक्ष संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.
➡️ जातीभेद विसरून ओबीसीच्या झेंड्याखाली एकत्र यावे- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
➡️ शहरातील फंक्शन हॉलच्या पाठीमागे सर्रास पुरवणारे, विक्री करणारे आणि पिणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई; १०१ ग्रॅम चरस सह ५ जण जेरबंद.
➡️ लासूर रोडवर जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो अडवल्याने महाराजासह तिघांना मारहाण; देवगाव पोलिसांत गुन्हा दाखल.
➡️ आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वबळावर भाजपचा झेंडा फडकणार-जिल्हाध्यक्ष विजय औताडे.
➡️ चोरी करून जनावरांची कत्तल करणाऱ्या ६ आरोपी विरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त.




