पॅरोलवरील कैद्याकडून तिसरा खून, सोलापुरातील फरार वृद्ध अखेर सापडला,

पॅरोलवरील कैद्याकडून तिसरा खून, सोलापुरातील फरार वृद्ध अखेर सापडला, इतकं क्रौर्य आलं कुठून?सोलापूर : वडापूर खून प्रकरणातील 65 वर्षीय आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमसिद्ध पुजारी असे खून प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे. दोन खुनाच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर आलेल्या आमसिद्ध पुजाऱ्याने तिसरी हत्या केली होती. धारदार शस्त्राने ज्ञानदेव नागणसुरे यांचा निर्घृण खून केल्याप्रकरणी वृद्ध हा मंद्रूप पोलिसांच्या ताब्यात आहे.सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे ही घटना घडली होती. आमसिद्ध पुजारी असे 65 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याने ज्ञानदेव प्रभू नागणसुरे नावाच्या 55 वर्षीय इसमाचा खून केल्याचा आरोप आहे. धारदार शस्त्राने डोकं, मान, गुडघ्यावर वार करुन पुजारीने नागणसूरेंचा जीव घेतला.चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्यायाआधी आमसिद्ध पुजारीने स्वतःच्या पत्नीचा खून केला होता. चारित्र्याच्या संशयावरून सात वर्षांपूर्वी डोक्यात दगड घालून त्याने बायकोची हत्या केल्याचा आरोप होता. तर पंधरा वर्षापूर्वी अंत्रोळी येथील लक्ष्मण सलगरे नामक इसमाचा पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने खून केला होता.खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर गावात आला होता. त्यानंतर आमसिद्ध पुजारी फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here