केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी 18 ऑक्टोबरला जिल्हयाच्या दौ-यावर
वर्धा, दि 16 🙁 जिमाका) केंद्रिय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी 18 ऑक्टोबर रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.
18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12. वाजता नागपूर येथून येळाकेळीकडे प्रस्थान करतील. दुपारी 1 वाजता सेलू तालुक्यातील येळाकेळी (खेर्डा) येथे जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था व्दारा केलेल्या धाम नदीवरील जलसंवर्धन कामाची पाहणी करतील. दुपारी 1.30 वाजता येळाकेळी येथून मांडवा कडे प्रस्थान करतील. दुपारी 1.45 वाजता मांडवा येथे आगमन व मातीनाला जलसंवर्धन प्रकल्पास भेट देतील. दुपारी 2.45 वाजता मांडवा येथून सेलू तालुक्यातील जामनी कडे प्रस्थान करतील. दुपारी 3 वाजता जामनी येथे आगमन व महात्मा शुगर ॲन्ड पॉवर प्रायवेट लिमिटेड येथे भेट. दुपारी 4.30 वाजता जामनी येथून नागठाणा चौक कडे प्रस्थान करतील. सायंकाळी 5 वाजता नागठाणा चौक येथील राष्ट्रीय महामार्ग व्दारा आयोजित रेल्वे उड्डानपुलाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता नागठाणा येथून देवळीकडे प्रस्थान करतील.
सायंकाळी 5.30 वाजता इनडोअर स्टेडियम येथे देवळी नगर परिषद व्दारा आयोजित विकास कामांचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6.30 वाजता देवळी येथून वर्धेकडे प्रस्थान करतील. सायंकाळी 6.50 वाजता मालगुजारीपुरा येथे जेष्ठ स्वयंसेवक कै. हरिकृष्ण उर्फ आप्पाजी जोशी चौकाचे नामकरण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता नगर परिषद मैदान येथे नगर परिषद व्दारा आयोजित विविध विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 8.30 वाजता कुमारप्पा मार्ग डॉ. डागा हॉस्पीटल जवळ येथे स्वातत्रवीर सावरकर स्मृती स्मारक लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.45 वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
0000