जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतले पालीच्या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन
श्री बल्लाळेश्वर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचीही घेतली सदिच्छा भेट
अलिबाग,जि.रायगड,दि. 16 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतले तसेच त्यांनी श्री बल्लाळेश्वर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चाही केली.
श्री बल्लाळेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांचे श्री बल्लाळेश्वरची प्रतिमा व श्रीफळ देवून यथोचित स्वागत केले.
यावेळी तहसिलदार दिलीप रायण्णावार, पोलीस निरीक्षक विजय तायडे, कृषी अधिकारी पंचायत समिती श्री.महामुनी, निवासी नायब तहसिलदार दत्तात्रय कोष्टी, मंडळ अधिकारी डी.के.सरनाईक, तलाठी नितीन शेळके, श्री बल्लाळेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्वस्त उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहुल मराठे, व्यवस्थापक शेखर सोमण हे उपस्थित होते.
000000






