दरोड्याचे तयारीतील गुन्ह्यात अटक आरोपींकडुन 49,000/- रु. किंमतीचे पाँवर फिडर , वायर, तांबे हस्तगत करुन तिन गुन्हे उघड श्रीगोंदा पोलीसांची कारवाई !
श्रीगोंदा लिंपणगाव (प्रतिनिधी) – दि. 16/07/2021 रोजी फिर्यादी श्री दिनेश सदानंद पडवळे रा.रोहा जि.रायगड ह. रा. घारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनर यांनी फिर्याद दिली की, कालीया प्रोजक्ट कंपनीचे सी. एन.जी.गॅस कंपनीचे काम श्रीगोंदा ते काष्टी रोडवर शेंडगेवाडी शिवारात चालु असताना आयडर कंपनीची वेल्डींग केबल तिची जाडी 50 SQUR ची 500 मीटर वायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. वैगेरे मजकुरचे फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 465/2021 भा.द.वि 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सुचनांवरुन दरोड्याचे तयारीतील गुन्ह्यात अटक आरोपी 1) परमेश्वर उर्फ परमेश वैयशा भोसले वय 25 वर्षे, रा. भेडाळा ता. गंगापुर जि. औरंगाबाद 2) सचिन अशोक जाधव वय 24 वर्षे रा. प्रवरासंगम ता. नेवास जि. अहमदनग 3) महेश रामकिसन धोत्रे वय 21 वर्षे रा. प्रवरासंगम ता. नेवासा जि. अहमदनगर 4 ) राजु शिवाजी जाधव वय 27 वर्षे रा. भेंडाळा ता. गंगापुर जि. औरंगाबाद यांचे कडुन खालील गुन्हे उघडकीस आणुन त्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.












