आज होणार औरंगाबादच्या विविध ४७ केंद्रांवर UPSC परीक्षा

*आज होणार औरंगाबादच्या विविध ४७ केंद्रांवर UPSC परीक्षा* _एकूण १४५०४ विद्यार्थी देतील परीक्षा._▪️ _परीक्षेसाठी एकूण १९८९ अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची नियुक्ती._ ▪️ _दोन सत्रात होणार परीक्षा._▪️ _परीक्षार्थीना परीक्षेच्या एक तास आधी उपस्थित राहण्याच्या सूचना._ *विद्यार्थ्यांसाठी UPSC प्रवेशासाठी कोणते नियम ?* • कक्षात फक्त प्रवेश प्रमाणपत्र, सॅनिटायझर बॉटल, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मुळ ओळखपत्र, पारदर्शक पाणी बॉटल एवढेच साहित्य आणण्याची परवानगी आहे. • डिजिटल डायरी, मायक्रोफोन, ब्लूटूथ, कॅमेराफोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षेच्या कक्षात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.• इलेक्ट्रॉनिक साहित्य आणल्यास उमेदवारांना स्वतःच्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवारात मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावी त्याची जबाबदारी आयोग घेणार नाही.• परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाज्याच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारावर फौजदारी व प्रशासकीय कारवाई केली जाईल. तसेच त्यांना आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली येथून आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here