*रस्त्यावरील खडड्यांमुळे एका महिलेची रूग्णालयात नेताना वाटेतच प्रसूती*_हादरे बसल्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू_ याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिऊर बंगला गावातील साजिया शेख नावाच्या महिलेला रात्री अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्याने खासगी वाहनातून औरंगाबादला रुग्णालयात घेऊन चालले होते. परंतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाटेतच गारज या गावाजवळ महिलेची प्रसुती झाली आणि यात बाळाचा मृत्यू झाला.
त्यानंतर पती समीर शेख आणि नातेवाईकांनी रुग्णालयात न जाता तसेच माघारी घरी जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर समीर आणि त्याच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. केवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बाळाचा जीव गमवावा लागल्याने समीर आणि साजिया दु:खी झाले आहेत. नागरिकांनी वारंवार सांगुनही खड्डे बुजवण्यात आले नसल्याने एका निष्पाप जिवाचा नाहक बळी गेला आहे. या घटनेनंतर आता नागरिकांनी मात्र प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केलाय. अनेकवेळा अशा घटना घडूनसुद्धा हे रस्ते दुरूस्त करण्यात येत नसल्याने नागरिक हैरान झाले आहेत. त्यामुळे आता प्रशासन हे खड्डे बुजवून नवीन रस्ते कधी बांधणार? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.___________________________________________________