वडगाव मावळ कोर्टाने दिले खासदार श्रीरंग चंदू बारणे यांच्या चौकशीचे आदेश* *सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे व डॉ . अभिषेक हरिदास यांनी खासदार श्रीरंग चंदू बारणे यांच्या विरोधात वडगाव मावळ येथे याचिका दाखल केली

*वडगाव मावळ कोर्टाने दिले खासदार श्रीरंग चंदू बारणे यांच्या चौकशीचे आदेश**सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे व डॉ . अभिषेक हरिदास यांनी खासदार श्रीरंग चंदू बारणे यांच्या विरोधात वडगाव मावळ येथे याचिका दाखल केली होती*प्रतिनिधी : संजय वायकरवडगाव मावळ : ६ / निवडून येणे कामी अनेक लोकप्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात बऱ्याच वेळेस खोटी माहिती देतात.खासदार श्रीरंग बारणे यांनी सन २०१९ ला ३३ मावळ लोकसभा निवडणुकीकरिता निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले होते . त्यानंतर नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट वरती टाकले होते.सदर प्रतिज्ञापत्र डावूनलोड केले असता असे लक्षत येते की बारणे यांनी निगडी पो .स्टे .गुन्हा क्र . ३२७१/२०१३ हा लपवला होता .तसेच त्यांनी या पूर्वीच्या म्हणजेच सन २००९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची SSC अनुत्तीर्ण १९८० मध्ये झाली असल्याचे नमूद केले होते .मात्र सन २०१९ चे निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची SSC १९८९ मध्ये झाल्याचे नमूद केले होते.त्यामुळे फिर्यादी अनिल भांगरे व डॉ . अभिषेक हरिदास यांनी वडगाव मावळ कोर्टात भ.द. वि . १९१,१९९,२०० व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ -अ अंतर्गत याचिका दाखल केली .त्यावर न्यायालयाने व्हेरिफिकेशन करून दि . ०४/१०/२०२१ रोजी सी आर पी सी २०२ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here