खा,सुप्रिया सुळेच्या हस्ते सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीच्या पाच मादी बछड्यांचे नामकरण..

खा,सुप्रिया सुळेच्या हस्ते सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीच्या पाच मादी बछड्यांचे नामकरण..औरंगाबाद : परिवारात जन्म झालेल्या बाळाचे नामकरण करतांना बाळाच्या आत्याला (वडिलांची बहिन) मान दिला जातो. तसा शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीच्या पाच मादी बछड्यांचे नामकरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते चिट्ठी काढून करण्यात आले. सदरील पाच बछड्यांचे नाव सुचविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देऊन सुमारे २०० नागरिकांकडून नावे सुचविण्यात आली होती. त्याप्रमाणे जिजाई, प्रतिभा, वैशाली, रंजना, रोहिणी असे या बछड्यांचे नामकरण करण्यात आले आहे.यामध्ये जिजाई हे नाव रामदास बोराडे यांनी तर प्रतिभा हे नाव विठ्ठलराव देवकर यांनी सूचवलेले आहे. तर वैशाली हे नाव अथर्व चाबुकस्वार यांनी, रंजना हे नाव कुसुम दिवाकर यांनी तर रोहिणी हे नाव पूर्वा पाटील यांनी सूचवलेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी समृद्धी वाघिणीच्या बछड्यानां नाव देण्याची अतिशय गोड संधी दिल्याबद्दल महानगरपालिका प्रशासक यांचे आभार व्यक्त केले.या वेळी खासदार सुळे म्हणाल्या की, ‘वाघ हा माझा आवडता प्राणी असून मी दरवर्षी वाघ बघण्यास ताडोबाला जात असते. पण आज जी गोड संधी मला मिळाली ही आयुष्यात एकदाच मिळते. या कार्यक्रमाची मला सदैव आठवण राहील.’यावेळी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे, अतिरिक्त आयुक्त नेमाने, सखाराम पानझडे,उपायुक्त सौरभ जोशी,पशु शल्यचिकित्सक डॉक्टर निधी सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here