मनमाड रोडच्या खडड्यांच्या कारणाने आणखी एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी

    868

    मनमाड रोडच्या खडड्यांच्या कारणाने आणखी एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी

    मनमाड रस्त्यावरील एका खड्यात मोटारसायकल आदळल्याने मागे बसलेली ४० वर्षीय महिला खाली पडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना राहुरी फॅक्टरी येथे शिवाजी पुतळ्यासमोर घडली आहे.

    त्यामुळे नगर – मनमाड रोडच्या खडड्यांच्या कारणाने आणखी एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी बळी गेला आहे. याबाबतयी अधिक माहिती अशी की, अशोक पंडित शेरमाळे, रा. दूधसागर, केडगाव, ता. नगर हे

    आपली पत्नी कोमल अशोक शेरमाळे, वय ४०, रा. दूधसागर केडगाव हे दोघे मोटारसायकल क्र. एमएय १६ सी आर ९५४५ या मोटारसायकलवरून नगरकडून मनमाडच्या दिशेने नगर-मनमाड रोडवरून जात होते.

    राहुरी फॅक्टरी येथे शिवाजी पुतळ्यासमोर असणाऱ्या खडड्यात ही मोटारसायकल आदळली. त्यामुळे मागे बसलेली कोमल शेरमाळे ही महिला रस्त्यावर खाली पडून जबर जखमी झाली.

    तिला तातडीने नोबल हॉस्पिटल नगर येथे औषधांपोचारासाठी नेले असता औषघोपचारादरम्यान तिचे निधन झाले आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here