महा24 न्यूज
सातबारा उता -यावर नाव लावण्यासाठी लाच, महिला तलाठी व कोतवाल ‘एसीबी’च्या जाळ्यात
नगर: तक्रारदार यांचे आजोबांचे मृत्यू पत्राप्रमाणे तक्रारदार यांचे वडील व काकांचे नावे शेतजमिनीचे 7/12, उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ४ हजारांची लाच स्विकारल्यानंतर महिला तलाठी व कोतवाल ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले आहेत. दि.१७ रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे ही कारवाई केली.यात श्रीमती स्वाती बबनराव झुराळे, (वय-31वर्ष, व्यवसाय- नौकरी, तलाठी, सजा निमगाव जाळी, तहसील संगमनेर, जि.अहमदनगर वर्ग-3. ) व संदीप लक्ष्मण तांबे, (वर 31 वर्ष, व्यवसाय-नौकरी, कोतवाल, सजा निमगाव जाळी, ता.संगमनेर, जि. अहमदनगर ) यांच्या वर कारवाई करण्यात आली. *सापळा अधिकारी -* जयंत शिरसाठ ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक. *सह सापळा अधिकारी – श्रीमती मीरा अदमाने,पोलीस निरीक्षक, ला. प्र.वि. नाशिक *सापळा पथक -* पोना/नितीन कराड, पोना/प्रभाकर गवळी, व पोना/प्रविण महाजन,चापोहवा/संतोष गांगुर्डे