_*केसगळतीवर हे घरगुती उपाय ठरतील रामबाण, लगेच करुन पाहा..!*_ ऐन तारूण्यात होणाऱ्या केस गळतीमुळे अनेकांची झोप उडते. केसगळतीसाठी आहाराला वा वाढत्या वयाला जबाबदार धरले जाते. अनेकदा भरमसाठ पैसे खर्चून उपाययोजना केल्या जातात. पण, त्यानेही फारसा फरक पडत नाही. अशा वेळी काही घरगुती उपायही केसगळती थांबवू शकतात. *कांद्याचा रस* – कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. *नारळाचे दूध वा तेल* – नारळातील मेद, प्रोटिन्स व मिनरल्स केस तुटण्याचे प्रमाण कमी करतात. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते. *हीना* – केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी ‘हीना’ वापरला जातो, मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.*जास्वंदाची फुले*- काही जास्वंदाची फुले कुटून तीळ वा खोबरेल तेलात मिश्रण करा. ते काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा. *आवळा* – यातील व्हिटामिन ‘सी’ व एन्टीऑक्सिडन्ट केसगळती थांबवते. आवळ्याचा अर्क वा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.*अंडी* – अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.?? *(केस गळतीवरील घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)*➖➖
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
हैदराबाद गॅझेट जीआरविरोधात कुणबी दाखल्यांची चौकशी करा; पंकजा मुंडेंनी घेतली स्पष्ट भूमिका
मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत यासाठी हैदराबाद गॅझेटवर आधारित जीआर काढला खरा मात्र यामु यामुळे सरकारची डोकेदुखी...
राष्ट्रवादीच्या मंत्र्याला प्रश्न विचारला, पत्रकाराला शिवसेनेची सत्ता असलेल्या मनपाची नोटीस
राष्ट्रवादीच्या मंत्र्याला प्रश्न विचारला, पत्रकाराला शिवसेनेची सत्ता असलेल्या मनपाची नोटीस
लंडनमध्ये ‘भारतविरोधी’ टिप्पण्या केल्याच्या आरोपावर राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. परराष्ट्र मंत्रालय (MEA) एस जयशंकर यांच्या...
अंकुश चत्तर खून प्रकरणातील; भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना पोलिसांनी केले...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी (दि. 15) रात्री सावेडी...




