बायकोचे अफेअर पकडले खरे मात्र त्यानंतर झाला ‘ उलटाच खेळ ॑

बायकोचे अफेअर पकडले खरे मात्र त्यानंतर झाला ‘ उलटाच खेळ ‘

लग्न झाल्यानंतर काही कालावधीत विवाहित महिलेला दिवस गेले आणि त्यांना एक मुलगा देखील झाला. मुलगा एक वर्षाचा झाला असताना पत्नीचे माहेरच्या एका प्रियकरासोबत सूत जुळले. प्रियकराने सोशल मीडियावरील शेअर केलेली माहिती पुराव्यासहित पतीच्या ताब्यात आली आणि त्यातून वाद निर्माण झाला. पतीने पत्नीला जाब विचारला मात्र त्याची बाजू कोणी ऐकून घेतली नाही. त्यानंतर त्याने सासुरवाडी गाठली आणि तेथील लोकांना याबद्दल जाब विचारला मात्र उत्तर देणे दूरच त्याला देखील तिथे धमकावण्यात आले.उपलब्ध माहितीनुसार , सदर घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर इथे घडलेली असून पतीची सासुरवाडी संगमनेर तालुक्यात आहे .पत्नीचे विवाहबाह्य संबंध लक्षात आल्यावर पतीची बाजू कोणीच ऐकून घेतली नाही म्हणून त्याने सासुरवाडी गाठली मात्र इथे देखील त्याच्या हाती निराशाच आली.अखेर या जावयाने सासुरवाडीत येवून विष प्राशन केले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत त्याने अखेरचा श्वास घेतला. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात प्रियकरासह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.पती मूळचा नाशिक जिल्ह्यातील एका गावातील आहे . पत्नीच्या प्रियकराने तिच्या पतीच्या मोबाईलवर तिच्याशी असलेल्या संबंधाची कबुली चॅटिंग व व्हिडिओ क्लिपच्या पुराव्यासह व्हॉटसअॅपवर पाठवल्याने पत्नीविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवरच आरोप करीत तिने घटस्फोटाची मागणी केली. पत्नी व तिच्या माहेरच्या व्यक्तींकडून चक्क त्यालाच दोषी ठरवून घटस्फोट देण्याची मागणी करण्यात आली त्यावरून तो हताश झाला होता. पत्नी व तिला पाठीशी घालणाऱ्या पालकांना कंटाळून त्याने अखेर मध्यरात्री सासुरवाडीत जाऊन विषारी औषध प्राशन केले. त्याला बेशुध्दावस्थेत संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात व नंतर घोटी येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पत्नी, तिचे आई, वडील, भाऊ व मोबाईल धारक अशा पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here