इंजिनिअर्ससाठी पदभरती, तरुणांना देशसेवेची संधी:

इंजिनिअर्ससाठी पदभरती, तरुणांना देशसेवेची संधी, पाहा कशी होणार निवड..? तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

भारतीय नौदलातील नोकरीच्या माध्यमातून देशसेवेचीही संधी मिळणार आहे. नौदलातील एसएससी (Short service commission officer) या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here