महा24 News औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..

_*महा24 News औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..*_? जायकवाडी धरणात सध्या १६ हजार ३४५ क्‍युसेक इतक्या मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक सुरू.?जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १३ रोजी स्थानिक सुटी जाहीर केली आहे. १२ रोजी रविवार असल्याने या सलग दोन दिवस सुटी आल्याने १२ सप्टेंबर रोजी घाटीचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) नेहमीप्रमाणे सुरु राहील. मात्र, १३ सप्टेंबर रोजी बंद राहील.? औरंगाबादेतील हर्सूल तलाव ओव्हरफुल; तलाव बघण्यासाठी नागरिकांची होतेय गर्दी.? जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी पिंपळगाव पांढरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी.? औषध भवन परिसरात घरांमध्ये पाणी घुसल्याने माजी नगरसेविकेच्या दिराने माजी खासदार चंद्रकांत खैरे व माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना धरले धारेवर.? मुकुंदवाडीतील मुकुंदनगर येथे काल रात्री रुपाली गायकवाड नामक 21 वर्षीय मुलीचा पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू .? फुलंब्री तालुक्यातील शेवता येथील गिरीजा नदीपात्रात असलेले केटीवेअर झाले ओवरफ्लो.? फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथील १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या.? लासूर स्टेशन येथे २२ शेळ्यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू.? कन्नड तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस; शिवना टाकळी प्रकल्पाचे ३ दरवाजे उघडून २० हजार १६० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.?आंबेडकर नगर-पिसादेवी रस्त्यावरील पुल गेला वाहून, नागरिकांना होत आहे त्रास.? सिल्लोड तालुक्यातील चारनेर वाडी येथे पावसाचे पाणी घुसले गावात; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

? जाधववाडी मंडी परिसरात चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने केली अटक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here