*विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू; ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा*

*विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू;

ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा*ईडीच्या कारवायांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सज्जड इशारा दिला आहे. विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ येतो, जातो. काळ जाईल तेव्हा सर्व दुरुस्त्या केल्या जातील, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. *शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारला हा इशारा दिला आहे. अनिल देशमुखांची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. या देशात महाराष्ट्रात एवढ्या ईडीच्या केसेस वाचल्या का कधी?, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत. विरोधकांना नमवण्यासाठी एक साधन म्हणून ईडीाच वापर केला जात आहे. ठिक आहे. काळ येतो आणि जातो. काळ जाईल तेव्हा त्यात दुरुस्त्या होतील, असं पवार म्हणाले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here