सर्पदंशाने बहीण-भावाचा मृत्यू
शिक्षणानिमित्त मावस काकाच्या गावी राहत असलेल्या बहीण-भावाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दर्यापुर तालुक्यातील थिलोरी येथील रहिवासी भीमराव चव्हाण यांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी, हि मुले राहत होती.
काल शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारात अचानक घरामध्ये साप निघाला. पवन बाळू चव्हाण वय १९ व स्वाती बाळू चव्हाण वय १३, या दोघांना या सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्याची माहिती घरातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने दोघाही जणांना दर्यापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
परंतु, त्या ठिकाणी दोघांचे उपचार न झाल्याने, त्यांना राशेगाव या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रस्त्याने जात असताना दोघाही बहीण-भावांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.