महा24 News महत्वाच्या बातम्या*

*महा24 News महत्वाच्या बातम्या*

▪️RSS ची तालिबानशी तुलना केल्याने गीतकार जावेद अख्तर अडचणीत, राम कदम म्हणाले, ‘माफी मागा, अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही..’

▪️कोरोनाचे संकट कायम; गेल्या 24 तासात 42 हजार रुग्णांची भर तर 308 जणांचा मृत्यू. राज्यात शनिवारी 4,130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 64 रुग्णांचा मृत्यू. केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह व्हायरसचं संकट गडद, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू..

▪️पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरची ‘सुवर्ण’ कामगिरी, भारताचं पाचवं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या 19 वर.. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजनं रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्यपदक. पॅरालिम्पिक समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराकडे.

▪️राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त देशातील 44 शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव. शिक्षकांनी मारले नसते, तर मी कधीच भाषण द्यायला शिकलो नसतो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितली शाळेतील आठवण..

▪️पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी ‘स्वाभिमानी’चं जलसमाधी आंदोलन, काही कार्यकर्त्यांच्या नदीत उड्या. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राजू शेट्टी यांच्यात सोमवारी बैठक होणार..

▪️राज्यात पावसाचं धुमशान, अनेक ठिकाणी नद्यांना पूर, शेतकऱ्यांचं नुकसान.. मराठवाड्यात मुसळधार पाऊस, पुरामुळे मोठी हानी..

▪️ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर निशाणा.. केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मागत बसण्यापेक्षा राज्य सरकारने तात्काळ गोळा करावा; ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी..

▪️पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here