15 दिवसात पुण्यातील जम्बाे हॉस्पिटल पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत होणार- आयुक्त विक्रम कुमार
पुणे : पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये 400 बेड नव्याने सुरु करण्यासाठी पीएमआरडीफकडून सध्या वर्कर ऑर्डर काढण्यात येणार आहे. त्यामुळे ते येत्या आठ दिवसांत येणार असून पुढील पंधरा दिवसात जम्बाे हॉस्पिटल पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत होणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं आहे. पुण्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. या परिस्थीतीत जम्बो हॉस्पिटलकरिता लागणाऱ्या मनुष्यबळाचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. त्यासाठी ससूनमधील तज्ञांची मदत घेतली जात आहे. जम्बो हॉस्पिटलची क्षमता वाढविण्याबरोबरच, बोणेर येथील कोविड हॉस्पिटलही सोमवारपासून पूर्ण क्षमतेने म्हणजेच 314 बेडसह सुरु होणार असल्याचेही कुमार यांनी सांगितलं.
पुणे महानगरपालिकेने स्वत:ची टेस्टिंग लॅब सुरु करावी, अशी मागणी सातत्याने नगरसेवकाकडून केली जात आहे. त्यामुळे एकाच दिवशी जास्तीत जास्त नागरिकांचे स्वॅब चेक करता येतील. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासही मदत होईल, असा विश्वास विक्रम कुमार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शहरी गरीब योजनेचा निधी शहरातील प्रत्येक नागरिकाचा दोन लाखांचा 9 महिन्यांचा विमा काढण्यासाठी खर्च करावा, अशी मागणी पक्षनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे.