धक्कादायक ! पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गर्भवती बायकोचा गळा दाबून पोटावर मारली लाथ

मुंबईमधील (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने (PSI) आपल्या गर्भवती बायकोचा गळा आवळुन तिच्या पोटावर लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बायकोच्या पोटात जोरात लाथ मारल्याने रक्तस्त्राव होऊन तिचा गर्भपात (Abortion) झाला आहे. या प्रकरणावरुन पीडीत पत्नीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात (Vijapur Naka Police Station, Solapur News) आपल्या पतीसह सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी पोलीस अधिकारी हा मुंबईमध्ये (Mumbai) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत आहे. ‘तुझ्या गर्भात वाढणारं बाळ माझं नाही. ते काढून टाक.तुझं बाहेर कोणाबरोबर तरी संबंध आहेत, असं म्हणत आरोपी पोलीसानं आपल्या पत्नीचा गळा दाबून तिच्या पोटावर जोरात लाथ मारली आहे.या मारहाणीमुळे पीडित महिलेचा रक्तस्त्राव होऊन तिचा गर्भपात (Abortion) झाला.यानंतर आरोपीनं पीडितेला तिच्या माहेरी सोलापूर याठिकाणी आणून सोडलं आहे.त्यावेळी आरोपीनं पीडितेच्या आई-वडिलांना देखील शिवीगाळ केलीय.पीडितेचं 2020 साली मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाशी (PSI) लग्न झालं होतं.दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे मोठ्या थाटात हा विवाह संपन्न झाला होता. विवाहानंतर आरोपी आपल्या पत्नीला घेऊन मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहायला आला.याठिकाणी काही दिवस आरोपीनं पत्नीला चांगलं वागवलं.पण त्यानंतर, सासू, सासरे, दीर हे लहान कारणांवरून तिला त्रास देऊ लागले. असं पीडीतेनं सांगितलं आहे.दरम्यान, दिराने वाईट हेतूनं आपला विनयभंग केल्याचा दावा तिने केलाय.नंतर एके दिवशी आरोपी पोलीस अधिकाऱ्यानं चारित्र्यावर संशय घेत महिलेला मारहाण केली.तसेच तिच्या पोटावर जोरात लाथ मारून तिचा गर्भपात घडवून आणला आहे.याप्रकरणी पीडितेन विजापूर नाका पोलीस ठाण्यात (Vijapur Naka Police Station) आरोपी पतीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here