351 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 164 जणांना दिला आज डिस्चार्ज

469

सातारा दि.4 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 351 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 3 (9833), कराड 40 (38129), खंडाळा 14 (13880), खटाव 22(24493), कोरेगांव 33 (21211), माण 8 (17044), महाबळेश्वर 2 (4592), पाटण 1 (9982), फलटण 90 (35254), सातारा 101 (49668), वाई 32 (15443) व इतर 5 (1929) असे आज अखेर एकूण 241458 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6059 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 164 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमूने – 1836016
एकूण बाधित – 241458
घरी सोडण्यात आलेले 228276
मृत्यू -6059
उपचारार्थ रुग्ण- 10536

                                   0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here