गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आरोग्य सुविधांसह सज्ज

489

अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.10 सप्टेंबर 2021 पासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत मुंबईहून कोकणामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.18 व क्र.4 वरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होते. यावेळी अपघात होवून जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक पुरेशा औषध साठा व रुग्णवाहिकेसह सुसज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी दिली आहे.
गणेशोत्सव काळात नेमलेल्या वैद्यकीय मदत पथकांची माहिती पुढीलप्रमाणे-
हमरापूर :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.दिक्षिता मोकल, मो.9028286605, आरोग्य सहाय्यक, श्री.विकास पाटील, मो.9767343069, आरोग्य सेवक श्री.शांताराम घरत, मो. 9890802010, आरोग्य सेविका, श्रीम.टि.व्ही.म्हात्रे, मो.9075019061, वाहन चालक श्री.किरण पाटील, मो.9260022149, शिपाई, श्रीमती नाईक, ॲम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.06 के 9840.
वडखळ :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.संजय गांगुर्डे, मो.9029818904, आरोग्य सहाय्यक, श्री.तुकाराम मोकल, मो.9226761548, आरोग्य सेवक, श्री.जे.वाय.मोकल, मो.9145269965, आरोग्य सेविका, श्रीम.एस.ए.पाटील, मो.9028216060, वाहन चालक श्री.सागर पाटील, मो.7350746400, शिपाई, श्रीमती रेश्मा पवार, ॲम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.06 के 9863.
वाकणफाटा :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.अमृता मस्के, मो.9763943783, आरोग्य सहाय्यक, श्री.एच.जे.डोळकर, मो.9850920107, आरोग्य सेवक, श्री.जे.जे.वारगुडे, मो.92171964073, आरोग्य सेविका, श्रीम.माया अनवाने, वाहन चालक श्री.अल्हाद पिंगळे, मो.8975408358, शिपाई, श्री.भाऊ आमडोसकर, मो.9273087716 ॲम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.06 के 9870.
कोलाड नाका :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.महेश वाघ, मो.8879873570, आरोग्य सहाय्यक, श्री.एस.आर.गायकवाड, मो.9552662395, आरोग्य सेवक, श्री.गणेश शिरसाठ, मो.9665665899, वाहनचालक श्री.ए.ए.आमरुसकर, मो.9273087716, शिपाई, श्रीमती बी.बी.देशमुख, मो.9225335499 ॲम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.06 के 9846.
इंदापूर :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.निखिलकुमार पटेल, मो.8600480482, आरोग्य सेवक, श्री.संजय राऊत, मो.8446944438 आरोग्य सेविका, श्रीम.राजेश्री काणेकर, मो.8149862734, वाहन चालक श्री.अक्षय विध्वंस, मो.7030678113, शिपाई, श्री.अनंत म्हस्के, मो.9271532334 ॲम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.06 के 9920
दासगाव :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.असरान आफ्रीन, मो.9112080806, आरोग्य सहाय्यक, श्री.पी.एम.पाटील, मो.9273427474, आरोग्य सेवक, श्री.डी.के.हाटे, मो.9975246015, आरोग्य सेविका, श्रीम.एस.व्ही.जोशी, मो.9657149442, वाहन चालक श्री.विशाल भोईर, मो.8793290705, शिपाई, श्रीमती रंजना मोरे, मो.8087447767 ॲम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.06 के 9855.
0000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here