ए.टी.एम. मशीन चोरणा-या टोळीचा मो-हक्या निघाला बनावट नोटा छापणारा मास्टरमाईंड, आरोपीचे घरातून बनावट नोटा छापण्याची सामग्रीसह आरोपी पोलीसांच्या ताब्यात
दिनांक 26/08/2021 रोजीचे रात्री 12.00 वा. चे सुमारास टाकळी ढोकेश्वर गावात स्टेट बैंक ऑफ इंडिया या बँकेचे ए.टी.एम. मशीन चोरण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल पारनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्याचा पारनेर पोलीसांनी 24 तासाचे आत छडा लावून तीन चोरट्यांना अटक केली आहे.
त्यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी विकास सुरेश रोकडे, वय 19 वर्ष. रा. वडगाव मावळ ता. पारनेर हा बनावट नोटा छापत असल्याची पोलीसांना कुणकुण लागलो होतो. परंतु ता का नोटा छप आहे बाबत स्पष्ठ माहिती मिळत नव्हती. त्या अनुषंगाने तसेच ए.टी. एम. चोरीच्या गुन्ह्याचे तपासाच अनुषंगाने शोध चालू असताना तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक एच. एन. उगले यांनी आरोपीचे वडगाव सावताळ, ता. पारनेर येथील घराची घरझडती घेतली असता त्याच्या घरात 500 व 100 रुपये दराच्या छापलेल्या बनावट चलनी नोटा व बनावट चलनी नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग, प्रिंटर क पेन कटर कात्री इत्यादी सामग्री मिळून आल्याने तो पोलीसांनी जप्त केली असून त्याविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 629/2021 भा.द.वि. कलम 489(अ), 489(ड) व 489(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.
आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेकडे छापण्यात आलेल्या नोटांचा वापर कोठे केला आहे. चावत विचारपूस करून त्यास मदत करणारे त्यांचे साथीदार आरोपीची माहिती व बनावट नोटांचे मोट कंट उघडकीस पण्याची शक्यता आहे. वरील कारवाई हो मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. सौरभ
अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम बळप, पोलीस उप निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार भालचंद्र दिवटे, सुधीर खाडे, सुरज कदम, सत्यजित शिंदे, श्रीनाथ गवळी, सचिन लोळगे व पोलीस मित्र अभिजीत जाधव अशांनी केली असून उर्वगत आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत
नागरिकांना आवाहन
या द्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की पातील आरोपीने कोणास
बनावट चलनी नोटांच्या सहाय्याने फसवणूक केलेली असेल, अथवा
बनावट चलनी नोटांचे संदर्भात काही अन्य अपराध केला असेल तर त्यांनी
पारनेर पोलीस स्टेशनशी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
पो. नि. श्री. घनश्याम बळ पो. उप निरी. एच. एन. उगले
पारनेर पोलीस स्टेशन
- (02488) 221533 -9552530527. -9922932230.




