पारनेरच्या दुर्गम भागात बनावट नोटांची छपाई; आरोपी अटकेतपारनेर(प्रतिनिधी.)तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विकास सुरेश रोकडे (वय१९,वडगाव सावताळ, पारनेर) बनावट नोटांची छपाई करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.यातील आरोपी विकास रोकडे बनावट नोटा छापत असल्याचा पोलिसांना संशय होता.परंतु तो हा उद्योग नेमका कोठे करतो याबाबत स्पष्टता नव्हती.’एटीएम’ प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक एच.एन.उगले यांनी आरोपी रोकडे याच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ५०० व १०० रूपये दराच्या बनावट नोटा व बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग,छपाईचे यंत्र,विशीष्ट कागद,कात्री इत्यादी साहित्य आढळले.बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी पारनेर पोलिसांनी विकास रोकडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
मुंबईला प्रस्ताव आवडले पाहिजेत: अर्थसंकल्प 2023 वर एफएम सीतारामन
अर्थसंकल्पीय प्रस्ताव वित्तीय एकत्रीकरण आणि वाढ, विशेषत: सर्वसमावेशक वाढ दोन्ही स्थापित करतात, सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी...
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 कोटींचे ड्रग्स जप्त केल्याने खळबळ
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींंचं ड्रग्स जप्त, पाच आरोपी अटकेत ड्रग्स कनेक्शन मागे मोठी टोळी असल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा संशय आहे....
मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं उत्तर, म्हणाले, ‘ते’ प्रकरण घडलं त्यावेळी सेवेतही नव्हतो
Mumbai Drugs case updates : नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या मेहुणीबाबत केलेल्या आरोपांनंतर वानखेडे यांनी या प्रकरणाशी त्यांचा संबंध कसा काय असू...
MLA : आरक्षणाबाबत आदिवासी आमदार आक्रमक
अकोले: आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी होऊ नये. धनगर व मराठा (Dhangar and Maratha) समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू...





