बारामतीत एका दिवसात १९ हजार ४५१ विक्रमी महालसीकरण

454


बारामती: येथे मंगळवारी (दि. ३१) महालसीकरण मोहीम राबविण्यात आली. या वेळी आरोग्य विभागाने एका दिवसात विक्रमी १९ हजार ४५१ नागरिकांचे लसीकरण केले.

बजाज ग्रुपच्या सौजन्याने जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविशिल्ड लसीचे लसीकरण मंगळवारी (दि. ३१) तालुक्यात ८६ व शहरात ६ लसीकरण केंद्रांवर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत लसीकरण करण्यात आले. या लसीकरणामध्ये १८ वर्षांवरील सर्व लोकांना पहिला डोस व ८४ दिवस पूर्ण झालेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पहिला डोस व दुसरा डोस अशा स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या. एका दिवसासाठी बारामती तालुक्याला एकूण १९ हजार डोसेस प्राप्त झाले होते. हे सर्व डोस एका दिवसातच वापरले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महालसीकरण मोहीम राबविण्यात आली.केंद्रावर मिळालेली लस संपेपर्यंत लसीकरण सुरू होते.अनेक ठिकाणी लसीकरणासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या.त्यामुळे आवश्यक केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १९ हजार ४५१ नागरिकांना लस देण्यात यशस्वी झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here