महा 24News- हेडलाईन्स, 2 सप्टेंबर 2021

*महा 24News- हेडलाईन्स, 2 सप्टेंबर 2021*

? अफगाणिस्तान: खावकमध्ये हल्ला करण्यासाठी आलेल्या 350 तालिबानींना ठार मारून 40 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले; नॉर्दर्न अलायन्सचा दावा ? अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सोडले, वकील आनंद डागा यांची सुरू आहे कसून चौकशी; रिपोर्ट लीक करण्यासाठी लाच दिल्याचा सीबीआयला संशय? मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती आज घेणार राष्ट्रपतींची भेट, सोबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ? महाराष्ट्रात 51,078 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,77,230 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,37,496 रुग्णांचा मृत्यू ? चाळीसगावच्या पूरग्रस्तांना कोकणच्या धर्तीवर मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन; 2-4 दिवसात पंचनामे पूर्ण झाल्यावर आढावा घेऊन होणार निर्णय ? नांदेड: अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक करणारी तरुणी पोलिसांच्या ताब्यात, चव्हाण यांची भेट झाली नाही म्हणून केली होती तिने दगडफेक ? भारतात 3,83,401 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,20,21,097 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,39,559 रुग्णांचा मृत्यू ? गायीचे रक्षण करणे हे कार्य केवळ एका धर्म पंथाचे नाही तर गाय ही भारतीय संस्कृती; गायीला मुलभूत हक्क देण्यासाठी राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा – हायकोर्ट? पावसाचा कहर: मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील 750 गावं पुराच्या विळख्यात, 500 पेक्षा जास्त जनावरे वाहून गेली ? शिर्डी साईबाबा संस्थानच्या ‘सीईओ’पदी भाग्यश्री बानायत, भाग्यश्री बानायत 2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी; विद्यमान सीईओ कान्हुराज बगाटे यांची बदली ? वीज बिलाचा शॉक! विठ्ठल मंदिरात लॉकडाऊनमध्ये एक कोटीचं दान; विठ्ठल मंदिर गेल्या 15 महिन्यापासून बंद तरी वीजबिल आलं 84 लाख रुपये ? डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती वादात, निवृत्तीनंतरच्या नेमणूक प्रकरणी तक्रार दाखल; नियुक्ती रद्द न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार ?परवानगी नाकारल्यानंतरही कसबा पेठ गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन; चंद्रकांत पाटलांसह पुण्यातील भाजपच्या अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here