Sidharth Shukla Passes Away | सिद्धार्थ शुक्ला याचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन

902

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिग ‘बॉस-13’ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या 40 व्या वर्षी मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ बिग बॉस 13 चा विजेता होता. या बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडले आहे.

सिद्धार्थ शुक्ला यांने टीव्ही मालिकांमध्ये अगदी कमी वेळात स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले होते. बालिका वधू सारख्या मालिकेत शिवची भूमिका साकारून अभिनेत्याने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. मात्र, करिअरच्या शिखरावर असताना सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला.

सिद्धार्थने त्याच्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत किती कमाई केली हे जाणून घेऊ –

Caknowledge.com च्या मते अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची नेट वर्थ अत्यंत चांगली होती. 2020 पर्यंत सिडची एकूण संपत्ती 1.5 मिलिअल डॉलर म्हणजेच जवळपास 10 कोटी 94 लाख 55 हजार 750 रुपये इतकी आहे. एका अभिनेत्यासाठी ही रक्कम खूप मोठी असल्याचे म्हटले जाते.

सिद्धार्थ शुक्लाची बहुतेक कमाई ही टीव्ही-शो आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून होत होती. सिद्धार्थ जे कमावतो ते पूर्ण मनाने दान देखील करायचा. सिद्धार्थ सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेत होता आणि भरपूर दान करत होता.

सिद्धार्थचे मुंबईत एक घर आहे. जिथे तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याने हे घर नुकतेच विकत घेतले होते. वाहनांबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्याला वाहनांची खूप आवड होती. त्याच्याकडे BMW X5 तसेच हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉब मोटरसायकल आहे.

सिद्धार्थ अत्यंत साधे जीवन जगायचा. तो नेहमीच रस्त्यावर फिरताना दिसायचा. बिग बॉस 13 जिंकल्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला. संपूर्ण देशाने त्याला खूप वोट दिले. अलीकडेच अभिनेत्याने डिजीटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले. जिथे तो “ब्रोकन बट ब्यूटीफुल” मध्ये दिसून आला. सिद्धार्थला या मालिकेसाठी बरीच प्रशंसा मिळाली. बिग बॉस जिंकल्यानंतर अभिनेत्याच्या कारकिर्दीला एक नवीन ब्रेक मिळाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here