Sidharth Shukla Passes Away : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन
Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. हिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.





