अहमदनगर :
बलत्काराचे गुन्ह्यातील मागील चार वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि, दिनांक १२/०४/२०१८ रोजीचे मध्यरात्री आरोपी नामे अंकूश बर्डे रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळून बारागाव नांदूर येथील फिर्यादी यांचे घरी जावून फिर्यादी यांचे अल्पवयीन मुलीस पळवून नेले अत्याचार केलेबाबात आरोपी विरुध्द राहूरी पो.स्टे. येथे गुरनं. २२० / २०१८ भादवि कलम ३६३, ३६६, ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. (२) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ व ४
सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अंकूश बर्डे हा फरार झालेला होता. मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे सुचनानुसार श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपीतांचा शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, फरार आरोपी अंकूश बर्डे हा राहूरी बस स्टैंड परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ / दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना/विशाल दळवी, शंकर चौधरी, पोका / सागर ससाणे, रणजित जाधव, सागर सुलाने, रोहीत येमूल, चालक पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून राहूरी येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे अंकूश सोपान बर्डे, रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी यास ताब्यात घेवून राहूरी पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील कार्यवाही राहूरी पो.स्टे. हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.






