राहुरी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त कृषी समितीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे .राहुरी तालुक्यातील सहा गावातील उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेत प्रशासनाने सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूजल संरक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण चालू केले.
राहुरी तालुक्यातील खंडाबे, संडे, वरवंडी, राहुरी खुर्द, पिंपरी अवघड, डिगस या सहा गावातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी क्र. 6 आणि 8 नुसार विद्यापीठ उर्वरित प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त भरती बाबत उचित कारवाई करावी. आणि विद्यापीठांमध्ये 45 टक्के पर्यंत रिक्त जागा आहे. जोपर्यंत जिल्हा प्रशासन मंत्रालयीन प्रशासन व विद्यापीठ प्रशासन या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहनार आहे तसेच न्याय नाही मिळाला तर उपोषण आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि उर्वरित प्रकल्पग्रस्त यांना विद्यापीठ सेवेत सामावून घेईपर्यंत शांत बसणार नाही असे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने करण्यात आल आहे.
यावेळी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष विजय शेंडगे, राहुल शेटे, श्रीकांत बाचकर, सम्राट लांडगे, लक्ष्मण वाघ आदींसह प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते





